Mumbai Maharashtra

गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा बहाल

मुंबई, / जॉन मेढे :- शासनाने गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” चा दर्जा बहाल केल्याने या लोक महोत्सवाची गरिमा वाढली असून त्यास आता शासकीय दर्जा प्राप्त झाला राज्य झाल्याची घोषणा करतानाच गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सव साजरा करीत असतो. म्हणूनच प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालये संस्था असनी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करावा .असे निर्देश कम आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी आज मुंबईत अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले
याबैठकिस राज्य तसेच केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एम एस आर डी सी महामंडळ, महानगर पालिका आयुक्त भूषण गगरानी, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आयुक्त, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई विद्यापीठ, सीमा शुल्क, बेस्ट, एमआयडीसी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एचपीसीएल, बीपीसीएल, मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय जीवन विमा प्राधिकरण, राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टीलायझर लि., भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, अदानी एअरपोर्ट, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य विकास पायाभूत सुविधा महामंडळ, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्ड, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महाजनको, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, अदानी पॉवर, टाटा ट्रस्ट, टाटा पॉवर या केंद्र व राज्य शासनाने वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर तो जगाच्या पाठीवर २२ देशांमध्ये साजरा होतो. या गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी 10 कोटी रुपयांची बक्षिसे ठेवली जाणार असून सोशल मीडियावरून विशेष मोहीम राबवली जावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील वल्ड युनोस्कोचा दर्जा मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विषय घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेत, यासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपण सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चित्रपट महोत्सव, शैक्षणिक कार्यक्रम आदी विषयांवर निबंध, चित्रकला, ब्लॉग स्पर्धा आयोजन यावे . अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत .

गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळात आपल्याला विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत "ऑपरेशन सिंदूर"द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात यावा आणि आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना यांचा गौरव करण्यात यावा, असेही निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी या बैठकीत दिले.

गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि सांस्कृतिक परंपरेची एक नवी ओळख जगाला झाली. लोकसहभागाने नटलेला सजलेला असा हा गणू बाप्पाचा महोत्सव आता साता समुद्रापार जास्त असल्याची ही नांदी आहे . आंतरराष्ट्रीय मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा एक सांस्कृतिक सोहळा ठरणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button