झाडाचा जीव वाचला…. पण!
मुंबई
/ प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अनेकविध प्रकारच्या विकास प्रकल्पांची कामे जोरात आणून जोमात सुरू आहेत. मात्र अशा विकास कामात निष्पाप आणि निरपराध झाडांची निर्घृणपणे कत्तल केली जात आहे .पर्यावरणाची ही मोठी शोकांतिका आहे.अशाच प्रकारे घाटकोपर पश्चिमेस असलेल्या किरोल गावात नुकतीच एक घटना घडली. गावाच्या मुख्य प्रवेश द्वारा शेजारीच मोडकळीस आलेले जुनाट शौचालय उभे आहे त्याला लागूनच असलेल्या या मोकळ्या जागेचा वापर सार्वजनिक कचरा डेपो म्हणुन वापर केला जात होता. अलीकडेच भाजपच्या वतीने येथे साफसफाईची मोहिम राबवून ही जागा कचरा मुक्त करण्यात आली. साफसफाईच्या नावाखाली सदर जागेवर भाजपा कार्यालय थाटण्याच्या विचारात असल्याची शंका गावकर्यांनी व्यक्त केली आहे.

तथापि .सदर जागा कुणाच्या मालकीची आहे याचा मनपा प्रशासनाने शोध घेऊनच मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणुनआरक्षित करा .अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे कचरा मुक्त जागा बळकावण्यासाठी एका निष्पाप झाडाचा घेतला जातोय हे भीषण सत्य लक्षात. येताच.,जागरूक नागरिकांनी सहाय्यक उद्यान अधीक्षक शैलजा सुर्यवंशी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याने त्या निष्पाप झाडाचा जीव वाचला आहे. त्याबद्दल नागरिकांनी एन. विभागाच्या सहाय्यक उद्यान अधीक्षक शैलजा सुर्यवंशी यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.

तथापि घाटकोपर मधील होत असलेल्या बेकायदा वृक्ष तोडीस मनपा उद्यान खात्याची मूक संमती असल्याचे बोलले जाते. याशिवाय कंत्राटदार आणि उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप केला जात आहे
.याच विभागात अमि ग्रुप च्या लालबहादूर शास्त्री मार्गावरील बेकायदा वृक्ष तोडी संदर्भात हरकत युक्त तक्रार करण्यात आल्यानंतर सहाय्यक उद्यान अधीक्षकांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई बाबत विधी खात्याकडे सल्ला मागितला आहे. मात्र त्याच वेळी सदर विकासकाने वृक्ष तोडीचा प्रस्ताव धाडला असल्याचे सहाय्यक उद्यान अधीक्षकांनी संबंधिताना कळवल असल्याचे समजते.
सहाय्यक उद्यान अधीक्षकांनी घेतलेल्या दुहेरी भूमिकेने याप्रकरणी संशयाचे धुके अधिक गडद झाल्याचे बोलले जात आहे. तसेच घाटकोपर पश्चिमेस असलेल्या जीवदया लेन मध्ये एका विकासकाने केलेल्या बेकायदा वृक्ष तोडीची रीतसर तक्रार होऊन ही सदर विभागाने पोलिसात गुन्हा दाखल करण्यास विलंब लावल्याने उद्यान खात्याच्या भ्रष्ट कारभाराकडे संशयाने पाहिले जात आहे दरम्यान यासंदर्भात माहितीसाठी स्थानिक नगरसेवक.श्री धर्मेश गिरी यांच्या संपर्क साधला असता ते मुंबई बाहेर. असल्याचे सांगण्यात आले..तर सहाय्यक उद्यान अधीक्षक शैलजा सुर्यवंशी यांच्याशी.संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या सुनावणीस गेल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले .

