Blog

बहर कांचनचा “सृष्टीकडून दिलेली दिवाळीची अनोखी भेट .…. आर/दक्षिण विभागातील

मुंबई “बहर कांचनचा “सृष्टीकडून दिलेली दिवाळीची अनोखी भेट .

…. आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व) येथील वीर अब्दुल हमीद उद्यानात सध्या एक अप्रतिम दृश्य खुललं आहे.उद्यानातील कांचन वृक्षांना असा बहर आहे की संपूर्ण परिसराचे सौंदर्य जणू नव्या तेजाने उजळून निघाले आहे. फुलांनी नटलेली झाडं, त्यावर खेळणारा कोवळा सूर्यप्रकाश, आणि मंद वाऱ्याच्या झुळुकीत दरवळणारा सुगंध… जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला आहे. कार्तिक ऋतूतील कदाचित हा पहिलाच बहर असेल आणि तो म्हणजे वृक्षप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमींसाठी सृष्टीकडून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दिलेली एक अप्रतिम भेट आहे

.या फुललेल्या कांचनांनी उद्यानातच नव्हे तर मनातही उत्सव फुलवला आहे.आनंदाचा, सौंदर्याचा आणि निसर्गाशी नातं घट्ट करण्याचा उत्सव. 💐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button