Header Ad
Hindi News / Blog

नामकरणाचा वाद कायम किरोल गावठाण उड्डाणपूल नाव देण्याचा जोरदार मागणी शिवसेना भाजप संघर्ष इरेला..

Article Top Ad


मुंबई /जॉन मेढे
पूर्व -पश्चिम उपनगरांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्टेशनवर बांधण्यात आलेला उड्डाणपुल नामस्मरणाच्या प्रतिक्षेत असून भाजपाचे आजी माजी आमदार आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात
सुरू असलेला वाद इरेला पोहोचला आहे .तर दुसरीकडे मनसे आणि स्थानिक नागरिकांनी पूल
नामकरण हा आमच्या अस्मितेचा प्रश्न असून पुलास केवळ किरोल गाव उड्डाणपूल नाव द्या अन्यथा या पुलावरून एक ही वाहन धावणार नाही . असा निर्वाणीचा इशारा किरोलच्या
नागरिकांनी दिला आहे.

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सदर उड्डाण पुलास अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव देण्याचा घाट घातला आहे तर भाजपाचे माजी आमदार प्रकाश मेहता यांनी प्रमोद महाजन यांच्या नावाचा आग्रह धरत आमदार पराग शाह याना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.अशातच भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी नेहमीच आग्रही असलेल्या मनसेने स्थानिक नागरिकांच्या मागणीला दुजोरा दिला आहे
त्यामुळे पूर्व उपनगरात विद्या विहार रेल्वे उड्डाणपुलावरून
राजकारण तापले असून स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेने शिवसैनिकांमध्ये नाराजीयुक्त रोष व्याप्त असल्याची चर्चा आहे
दरम्यान शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या आरोग्य भवन आणि त्यांच्या नावाचा सौदा कोणी केला ? .याचा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः जातीने लक्ष्य घालून शोध घ्यावा . सर्व स्तरातून अशी मागणी पुढे आली आहे

Article Inline Ad
Article Bottom Ad

```html
🔔
Get Latest News Updates
Allow notifications to receive the latest news and important updates.
```