नको रेती ,नको सिमेंट अन प्लास्टर ही नको

मजबूत भिंतींसाठी वापरा जपानी तंत्रज्ञानाचा रंग
मुंबई / जॉन मेढे
फिनिक्स ची उपमा लाभलेल्या जपान आणि भारत यांच्यातील मैत्रीचं एक अतूट नातं आहे. हे अवघा आशिया खंड जाणतो .नव नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून जपाननं त्याचा वापर जगाच्या कल्याणासाठी केला आहे .तसा जपान हा अत्यंत शांत, मितभाषी आणि शिस्तीचे पालन करणारा देश .त्यामुळे भारतीय संस्कृती परंपरा यांच्याशी त्याची नाळ जोडलेली आहे. याची साक्ष इतिहास ही देईल . आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत जपान यांच्यामध्ये सुलभ अस एक व्यापारी धोरण आहे. त्यानुसारच सर्व करारमदार होत असतात. त्याच धर्तीवर भारतात इको फ्रेंडली वॉल कलर हे तंत्रज्ञान युक्त रंग आणण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे .अशी माहिती डॉ.प्रमोद वहाने यांनी जनसमाचार शी बातचीत करताना दिली .

सन २०००.पासून भारत जपान यांच्यात जागतिक स्तरावर व्यापार उद्योगात भागीदारी असू२००६ .,२०१४ या दरम्यान ह्या दोन्ही देशांनी जगाला आपल्या अनोख्या मैत्रीची ओळख करू दिली.
भारतात उत्पादक क्षमता असूनही उत्पादनाच्या स्रोतांचा वापर योग्य दिशेनं होताना दिसत नाही .म्हणूनच भारतीय उत्पादन स्रोत आणि जपानी तंत्रज्ञानाचा अवलंब करून एक नवीन तंत्रज्ञान विकसित करीत आहोत .त्याचाच एक भाग म्हणून भितिका रंग आणण्याच्या प्रयत्नात आहोत. जपान मध्ये स्थायिक आलेले डॉ.प्रमोद वाहने हे नागपूरचे सुपुत्र .त्यांचं बालपण शिक्षण नागपुरात झालं ..पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून त्यांनी मुंबईत आरे डेअरीत नोकरी करत नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये काम केले. परदेशात जाण्याची संधी त्यांना इन्शुरन्स कंपनीमुळे मिळाली.अमेरिकेत त्यांनी आपला उद्योग व्यवसाय सुरू ठेवला.पुढे त्यांनी अमेरिका सोडून जपान मध्ये स्थायिक झाले आहेत.

जपान मध्ये स्थायिक होणारे ते पहिले भारतीय नागरिक आहेत .ह्याशिवाय जापान मधील इंडियन जपान इंग्लिश स्कूल च्या संचालक पदी ते कार्यरत असून टोकियो चेंबर्स ऑफ कॉमर्स चे सदस्य आहेत. निर्माल्य आणि कचरा व्यवस्थापन अर्थात टाकाऊ पदार्थांपासून हायड्रोजन निर्मिती करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून काम पहाता आहेत .
सध्या त्यांनी भारतात इको फ्रेंडली वॉल कलर हे तंत्रज्ञान विकसित असलेला रंग आणला आहे. साधारणपणे आपल्याकडे घर बांधताना माती ,वाळू सिमेंट काँक्रिट यांचा वापर करून मग प्लास्टर
केले जाते.त्यानंतर रंग रंगोटी केली जाते.
शंतनु मेनन आणि मासाओमी सुझुकी ह्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे यापुढे भिंतींना प्लास्टर करण्याची गरज पडणार नाही . खरे तर जपानी तंत्रज्ञानाचा जगभरात बोलबाला आहे .बांधकाम तंत्रज्ञानात जपानचा हात कोणीही धारू शकत नाही .रेती सिमेंट काँक्रिट यांच्या ऐवजी हा एको फ्रेंडली वॉल पैंट वापरला तर भिंत आणि बांधकाम आयुष्य वाढते त्याला वेळीच बळकटी येते .असा दावा डॉ. प्रमोद वहाने यांनी केला आहे.
ते तंत्रज्ञान भारतात ही लवकरच विकसित करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करून डॉ .वहाने यांनी सांगितले की याकरिता भारतात सरकारशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ही डॉ. वहाने यांनी दिले.