भाजपा आमदार मिहिर कोटेचा धमकी प्रकरण

मुंबई / प्रतिनिधी
गेल्या वर्ष दीड वर्षापासून विविध प्रकारच्या धमक्या आणि हल्ले यांना तोंड देत लोकहितासाठी झटणारे मुलुंड भाजपचे आमदार मिहिर कोटेचा हे धीरोदात्तपणे उभे आहेत. गेल्या दीड वर्षात त्यांना अनेक धमक्या देण्यात आल्या शिवाय सतत होणाऱ्या हल्ल्यांना न भीता निडरपणे आमदार मिहिर कोटेचाब सामना करत आहेत .या विषयी एका बाजूला त्यांचं त्यांच्या धाडसाचं कोड कौतुक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला हा प्रसिद्धीचा स्टंट आहे.अशी कुजबुज मुलुंड मध्ये आहे
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचारा दरम्यान कोटेचा यांच्यावर मानखुर्द शिवाजी नगर परिसरात हल्ला झाला .त्यातून ते बचावले होते .तर दुसऱ्यांदा मुलुंड येथील त्यांच्या निवडणूक कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करण्यात यशस्वी ठरलेल्या मिहिर कोटेचा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करलेल्या मिहिर कोटेचा यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.त्यावेळी त्यांच्या एका बँक्वेट हॉलमध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती .त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्या हॉल मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. तो ही त्यांनी हाणून पाडला होता. अलीकडेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला . त्यांच्याच मतदारसंघात राहणाऱ्या एका इसमाने त्यांच्या चालकास धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला.पूर्वी मुंबईत दाऊद इब्राहिम ,अमर नाईक छोटा राजन ,अरुण गवळी यांच्या प्रभावळीतील नामचीन गुंड धमकी देत. गल्लीबोळातील एक समाजकंटक भाजपाच्या राज्यात भाजपा आमदाराला धमकवतो .ही अत्यंत गंभीर बाब असून खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उपयुक्त विजयकांत सागर यांची भेट घेऊ निवेदन दिले .