Blog

राजावाडी रुग्णालय शव विच्छेदन न्यायालयासमोरील बाळासाहेब ठाकरे आरोग्य भवनाचा वाली कोण ?

घाटकोपरमध्य स्टॉल आणि भू माफियांचा सुळसुळाट

जाॅन मेढे वरिष्ठ पत्रकार

महानगर पालिका प्रशासन आणि पोलिसांशी असलेले अर्थपूर्ण संबंध व राजकीय वरदहस्त लाभलेल्या भू आणि स्टॉल माफियांचा घाटकोपर मध्ये सुळसुळाट वाढला असून राजावाडी रुग्णालयाच्या शव विच्छेदन न्यायालयासमोर बांधण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य भवनाचा वाली कोण?

अशी जोरदार चर्चा घाटकोपर मध्ये सध्या सुरू आहे . रिलायन्स मेट्रो रेल्वे स्टेशन खाली हिराचंद देसाई मार्गावर एकाच ठिकाणी चार बेकायदा स्टॉल उभे असून पैकी दोन स्टॉलवर बी एम सी.चे दर्शवली आहेत तर अन्य दोन स्टॉल हे कोविड दरम्यान त्याठिकाणी आणून ठेवण्यात आले आहेत. तसेच त्याशेजारीच उसाचा चरक गेल्या वर्ष दीड वर्षांपासून सुरू आहे .

मात्र त्यासाठी वीज आणि पाणी कोठून आले.त्याचे पितृत्व कोणाकडे आहे . तर खोत लेन मेट्रो रेल्वे स्टेशन जिन्या खाली वर्षभरापूर्वी दोन स्टॉल राजरोसपणे उभे आहेत पण ते स्टॉल कोणी कशासाठी का उभे केले आहेत .याची कोणतीही खातरजमा मनपा अधिकारी कर्मचारी करत नाहीत ही मोठी खेदाची बाब आहे.

विशेष म्हणजे एन विभागाचे संबंधित खात्याचे अधिकारी कर्मचारी घाटकोपर स्टेशन समोरच असलेल्या भारत कॅफे नामक हॉटेलात रोज सकाळी अल्पोपहार घेत असल्याचे बोलले जाते . अतिक्रमण निर्मूलन आणि फेरीवाला विरोधी पथक हे सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी साडेसात वाजता आपले वाहन स्टेशन परिसरात उभे करून फेरीवाल्यांशी गप्पा मारत असतात .पण कारवाई करण्यास कचरतात आणि पोलिस यंत्रणा साथ देत नसल्याचे ओरड करून ही कारवाई टाळत आहेत का असा सवाल घाटकोपर मधील त्रस्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ह्या सर्व प्रकारच्या उपद्रव मूल्यांच्या विरूध्द पोलिस आणि मनपा प्रशासनाच्या कारवाईच्या कार्यवाही याबाबत संधिग्दता व्यक्त करण्यात येत आहे . खोत लेन मध्ये मेट्रोच्या जिन्या खालीच गत वर्षापासून दोन स्टॉल अगदी रुबाबात उभे आहेत.सर्वोदय रुग्णालय कॉर्नर आदी परिसरात भू छत्र उगवल्यासारखे स्टॉल उभे आहेत . ह्या बेकायदा टप्पऱ्यानी नागरिकांची लक्ष्य वेधलें आहे .पण ही करामत कुणाची ?

असा प्रश्न ही घाटकोपर वासियांना पडला आहे मात्र कारवाईबाबत मनपा प्रशासन आणि पोलिस ॲक्शन मोड वर कधी येणार याकडे समस्त नागरिक डोळे लावून बसले आहेत.कोविडच्या दुःखद कालखंडा दरम्यान आणि आणि नंतर घाटकोपर पूर्व आणि पश्चिम भागात अनधिकृत टप्पऱ्यांचे जणू पेवच फुटले आहे .तर विविध राजकीय पक्षांशी लागेबांधे असलेल्या स्थानिक नेते नगरसेवक आणि आमदारांनीही या संधीचा पुरेपूर लाभ घेतल्याचे समजते.

शासकीय योजना राबवून त्यातूनच आपले कार्यालये व मर्जीतल्या संस्थांचे इमले उभे करून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.गेल्या काही दिवसांपासून घाटकोपर परिसरात अनेक बेकायदा स्टॉल आणि टप्पऱ्या राजरोसपणे उभ्या आहेत .. तसेच घाटकोपर टपाल कचेरी देखील ह्या अनधिकृत स्टॉल आणि फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटलेली दिसत नाही ह्या सर्व गैव्यवहार प्रकरणात कुणाचे हित आणि हितसंबंध गुंतले आहेत? हा खरा संशोधनाचा विषय आहे ! स्थानिक राजकीय नेते आणि नगरसेवक आशीर्वादाने काही संस्थांनी आपलीं पोळी भाजून घेतली आहे.

त्यातच भर म्हणजे एकाबाजूला घाटकोपर पूर्व आणि पश्चिम भागातील अनधिकृत फेरीवाले तर दुसऱ्या बाजूला मस्तवाल रिक्षावाल्यांची वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेली दादागिरी . यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत .याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा घाटकोपरवासियांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button