Blog

बेकायदा फेरीवाले आणि मुजोर रिक्षचालकांच्या विरोधात अखेर पराग शाह सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरले मुंबई / जॉन मेढे

बेकायदा फेरीवाले आणि मुजोर रिक्षचालकांच्या विरोधात अखेर पराग शाह सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरले


मुंबई / जॉन मेढे


गेल्या काही वर्षांपासून घाटकोपर पूर्व आणि पश्चिम परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी आणि मुजोर रिक्षाचालकांनी मांडलेल्या उच्छादाने घाटकोपर मधील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. अनधिकृत फेरीवाले आणि मोकाट रिक्षावाल्यांच्या विरूध्द पोलिस आणि मनपा यांच्याकडे अनेकदा तक्रारी करून व दाद मागून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती .अशावेळी एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रश्र्नाकडे बहिरे आणि मुकेपणाचे सोंग घेतलेल्या शासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी घाटकोपर पंतनगरचे आमदार पराग शाह हे थेट रस्त्यावर उतरले . आणि दादागिरीला त्यांनी आव्हान दिले .याच दरम्यान कायदा धाब्यावर बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका मुजोर रिक्षाचालकाच्य कानाखाली त्यांनी आवाज काढला. एरवी शांत असलेल्या ह्या लोकप्रतिनिधींचा रूद्र अवतार पाहून घाटकोपर वासियानी आश्चर्य व्यक्त करत त्यांचं कौतुकही केलं असून त्यांच्या या आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.


घाटकोपर पूर्व आणि पश्चिम परिसरात सकाळ संध्याकाळी रिक्षावाले आपली मनमानी करीत असतात. वाहतूक पोलिसांनाही ही मंडळी जुमानत नाहीत. तर दुसरीकडे पदपथावर अतिक्रमण करून पादचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारे अनधिकृत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास महानगर पालिकेचे अधिकारी कच खातात . कुठली ही शासकीय यंत्रणा कारवाई करत नसल्याने सामान्य माणूस सर्व सहन करीत असल्याने ह्या मंडळींचे धाडस वाढले आहे .

अखेर त्याविरुद्ध भाजपचे स्थानिक आमदार पराग शाह हे थेट रस्त्यावर उतरून त्यांनी निद्रिस्त सरकारी यंत्रणेला जाब विचारला आहे.याबाबत पोलीस आणि महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलून कारवाई करावी.अशी मागणी केली आहे ,की जेणे करून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल .
दरम्यान घाटकोपर मधील काही सडक छाप आणि बाजार बुणगी मंडळी आमदार पराग शाह यांच्या विरूध्द गरळ ओकत आहेत.

पण सर्व सामान्य नागरिकां साठी त्यांनी आतापर्यंत काय महत कार्य केले आहे. ते दाखवा ? असा सवाल घाटकोपरमधील सुज्ञ जनतेने केला आहे.तर यापुढे कुणाचीही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही .असा इशारा आमदार पराग शाह यांनी दिला आहे .बेकायदा फेरीवाले आणि मुजोर रिक्षचालकांच्या विरोधात अखेर पराग शाह सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरले



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button